Saturday, March 5, 2016

जीवन सुंदर आहे...

आपण नाटक पहायला गेलो तर पुढली सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची.
तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असतं...!
ते अविचल कधीच नसतं...! साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!! जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात...! वेडे आणि लहान मुले.. !
ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...! जगण्याचा आनंद घ्या...! तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही...! आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे...! जे तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतात त्यांना साथ द्या आणि त्यांची सोबत घ्या...!!
जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...

नाते...

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला ... कोणत्याही नावाची गरज नसते... कारण न सांगता जुळणा-या नात्यांची ... परीभाषाच काही वेगळी असते..
शुभ सकाळ...

जिंकणे म्हणजे...

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते.  एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय ...
- टाेनी ब्लेअर

स्पष्टीकरण...

हरल्यावर आपण का हरलो? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, मात्र जिंकल्यावर स्पष्टीकरणाचा एक शब्दही द्यावा लागत नाही...
- हिटलर

यश...

इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा, ईतरांपेक्षा जास्त काम करा आणि ईतरांपेक्षा कमी अपेक्षा करा. या तीन
गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत ...
- विल्यम शेक्सपियर

विचार...

प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो.     मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही...
- लिओ टॉलस्टॉय

विश्वास...

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे, हे खूपच धोकादायक होय ...
- अब्राहम लिंकन

चूक...

जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही, तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे ... 
- आईन्स्टाईन

रस्ता...

दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल, तर तुम्ही चूकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.
- स्वामी विवेकानंद