Sunday, June 19, 2016

आेलावा...

पूर्वी चार ढग एकत्र आले की मुसळधार पाऊस पडायचा. आता आभाळ ढगांनी अंधारले तरी थेंब निथळत नाही.

पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं. आता बुडाशी जाऊन बसलं तरी ओंजळ भरत नाही.

पूर्वी माणसाच्या खांद्यावर हात ठेवला की आपुलकीचा झरा वाहायचा आता ह्रदयात हात घातला तरी ओल लागत नाही.

थोडक्यात: हे ढग काय, ही विहीर काय, हा माणूस काय ...चराचरातून ओलावा आटत चाललंय हेच खरं !
माती आणि  नाती यांतला ओलावा जपुया.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.